करमाळा प्रतिनिधी

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्या मधून समाजाला एक नवी दिशा देण्याचे उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लेखनीतून आवाज उठवुन समाज कल्याणाचे कार्य केले असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष

प्रा.रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी कोंढारचिंचोली ता.करमाळा येथे मोठया उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मकाईचे मा. चेअरमन दिग्विजय बागल,

बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे, कोंढरचिंचोलीचे सरपंच शरद भोसले, यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांच्या शुभहस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी

मकाईचे संचालक रामभाऊ हाके, अॅडवोकेट नितीनराजे भोसले, पंचायत समितीचे सदस्य नागनाथ काका लकडे, आदिनाथचे माजी संचालक किरण कवडे, मोहन धांडे, टाकळीचे गोरख गुळवे, जागतिक आरोग्य सल्लागार गोकुळ सर जायभाय, किशोर

सर दहिवळ, मकाईची माजी संचालक नंदकिशोर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होते. यावेळी पुढे बोलताना प्रा.रामदास झोळ म्हणाले की, आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले. अण्णाभाऊंची लेखणी

म्हणजे जाणीव. ज्या ज्या वेळी त्यांच्या हाती पेन आला तो एक तलवार होउनच. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यीक ही होऊ शकतो, हे अण्णाभाऊनी दाखवून दिले. अण्णाभाऊ साठे अमर शेख, द. ना. गव्हाणकर या शाहिरांनी आपल्या बुलंद आवाजांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आकाशच पेटवून दिले. आधुनिक भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासात अण्णाभाऊंनी केवळ दीड दिवस शाळेत जाऊन तब्बल ३५ कादंबऱ्या, १३ कथासंग्रह, १० प्रसिद्ध पोवाडे, पटकथा वगनाट्य, लावणी यांची निर्मिती केली. फकिरा, वारणेचा वाघ, पाझर, गुलाम, वैर अशा प्रसिद्ध कादंबऱ्या, कृष्णाकाठच्या कथा, गजाआड, चिरानगरीची भूत, जिवंत काडतूस असे कथासंग्रह आणि माझा राशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले. रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या’ निमंत्रणावरून अण्णाभाऊ सन १९६१ साली राशियास गेले होते. तेथील अनुभवांवर आधारित ‘माझा राशियाचा प्रवास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या मनावर कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या लावण्यामध्ये ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावण्या अजोड आणि अविस्मरणीय आहेत. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा सुंदर पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते.”जग बदल घालुनी घावा सांगून गेले मज भीमराव” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत खुप गाजले. अशा पध्दतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेचे कार्य प्रेरणादायी असून त्याचा आदर्श घेऊन वाटचाल करावी. कोंढारचिंचोली गावाचे कौतूक करुन गावाच्या विकासासाठी आपण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात राज्यस्तरीय विशेष तज्ञ शिक्षक पुरस्कार प्राप्त तुकाराम पाडोळी, निवृत्त एसीपी राजेंद्र गलांडे, नूतन मुंबई पोलीस अक्षय गुल गलांडे, निवृत्त जिल्हा निबंध भीमराव खांडेकर, भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कोंढरचिंचोली लांडगे परिवाराच्यावतीने आयोजित जयंती मोठया उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *