शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले चतुर्थ दर्शन यात्रेचे आज पौर्णिमेच्या दिवशी आयोजन
करमाळा प्रतिनिधी
संकेत खाटेर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले चतुर्थ दर्शन यात्रेचे आज पौर्णिमेच्या दिवशी आयोजन करणेत आले असून भगवताचार्य कौस्तुभजी रामदासी महाराज ( मिरज ), जैन समाजाचे
अध्यक्ष चंद्रकांतजी कटारिया यांच्या हस्ते गाडीची पूजा करून यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भगवताचार्य कौस्तुभजी रामदासी महाराज यांनी यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.आपले विचार व्यक्त करताना सांगितले की देवदर्शन यात्रा करणे पुण्याचे काम आहे पण यात्रा घडवून आणणे हें भगवंताचे काम असून ते सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर करत असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच यात्रेला जाणाऱ्या भाविकांना पण आजच्या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. या
यात्रेसाठी 115 भाविक सकाळी सहा वाजता रवाना झाले.
यावेळेस अँड. बाबुरावजी हिरडे, माजी नगरसेवक नारायण तात्या पवार ,पसंगराव साहेब, अनिल सोळंकी, जितेश कटारिया ,रनसिंग साहेब, नानासाहेब साळुंखे, नाथाजी शिंदे, कालिदास फंड, विनायक पवार, अप्पा झाकणे, पांढरीनाथ फंड, वैभव दोशी, प्रवीण मंडलेचा, बाळासाहेब महाजन, संतोष गुगळे, मुन्नाशेठ शिगची,अनंता मसलेकर, वर्धमान खाटेर, विजय बारीदे,यांचेसह
नगरसेविका संगीता खाटेर, डॉ. सरोजनी महाजन, नलिनी जाधव, मंजू देवी, भारती देवी, सरिता सोळंकी, भारती बलदोटा, नीता सोळंकी, उषादेवी हिरडे, ज्योती मंडलेचा, ज्योसना लुनिया,उज्वला देवी, सुवर्णा बलदोटा यांचेसह अनेक पुरुष, महिला भाविक उपस्थित होते. वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.