पडसाळी गावासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन मिळालेल्या अद्ययावत व्यायामशाळेचे लोकार्पण संपन्न

करमाळा प्रतिनिधी

पडसाळी गावातील विद्यार्थी, तरुण व युवक मित्रांचा शारिरीक व्यायाम होऊन तंदुरूस्त पिढी निर्माण व्हावी यासाठी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार

रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे माध्यमातुन इतिहासांत पहिल्यांदाच पडसाळी गावात अद्ययावत अशा व्यायामशाळेला मंजुरी घेतली आणि सततचा पाठपुरावा करून लवकरात लवकर व्यायामशाळा तयार केली.

गावचे कर्तव्यदक्ष सरपंच योगेश पाटील यांचे प्रयत्नाने व संकल्पनेतुन अद्ययावत अशा व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली.

सदर व्यायामशाळेचे छत्रपती संभाजी महाराज व्यायाम शाळा असे नामकरण करून लोकार्पण आज करण्यात आले आहे. त्यासाठी त्या जीमचा लोकार्पण समारंभ ग्रामपंचायत कार्यालय पडसाळी येथील सभागृहात संपन्न झाला आहे.

यावेळी निवृत्त कृषी अधिकारी रामचंद्र काका मुटकुळे यांचे हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माजी सरपंच दत्ता नाना फरड हे उपस्थित होते. यावेळी कुर्मदास पाटील, गोपिनाथ मुटकुळे, सरपंच योगेश

पाटील, सदस्य चंद्रकांत देशमुख, तानाजी देशमुख, महेश पाटील, दत्तात्रय देशमुख, सचिन मुटकुळे, अनुरथ पाटील, प्रशांत मुटकुळे, निलेश शिंगाडे, उमेश मुटकुळे, भारत सुतार, जोतिराम मुटकुळे, नारायण थोरात, प्रशांत पाटील, फौजदार फरड,

आत्माराम मुटकुळे, सागर गोरे, अक्षय पाटील, राकेश साळुंखे, माऊली मुटकुळे, शिवरत्न पाटील, आदित्य मुटकुळे यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पडसाळी गावची पहिली महिला चार्टर्ड अकाऊंटंट म्हणुन निवड झाल्याबद्दल शैला आत्माराम मुटकुळे-गोरे हिचा सन्मान ग्रामपंचायत पडसाळी येथे ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी शैला मुटकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, प्रयत्न आणि निश्चय केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. माझ्यावर माझ्या कुटंबाने विश्वास ठेवला व हे तु करू शकतेस म्हणुन पाठिंबा दिला, त्यांच्या या पाठिंब्यामुळे मी हे यश संपादन करू शकले. मी पडसाळी गावची लेक या नात्याने गावासाठी काम करून आणखी मोठ मोठे अधिकारी तयार व्हावेत यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिला. गाव आता सरपंच योगेश पाटील यांचे माध्यमातुन प्रत्येक गोष्टीत नंबर एकवर आहे परंतु शिक्षणात प्रगती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझा सन्मान केल्याबद्दल आभारी आहे. मी कायम या गावची लेक म्हणुन आपल्या सर्वांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करीन असे यावेळी त्या म्हणाल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *