हिसरे येथील संविधान चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी
हिसरे येथील ऐतिहासिक संविधान चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बहुजन समाज पार्टी करमाळा विधानसभेचे युवा नेतृत्व राजेश पवार यांनी ज्या मनगटात बळ,बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो अशा विचारसरणी असणाऱ्या घोड्याच्या पाठीवर आपली मान आणि हातात
तळपती तलवार घेऊन, त्यावेळच्या प्रस्थपित व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेऊन 29 वर्षे राज्यकारभार चालविणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेतला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भिमनगर हिसरे यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हिसरे गावचे सुपुत्र सिनिअर गुप्त वार्ता अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस कॉन्स्टेबल
पोमल रंदील साहेब, बुलढाणा अर्बन बँकेचे अधिकारी गणेश माळी, पैलवान बाळासाहेब पवार, पैलवान अंकुश सातपुते, प्रदीप सातपुते, तायप्पा सातपुते, छोटू पवार, दिलीप ओव्हाळ, योगेश ओहोळ, झुंबर पवार, चंद्रकांत पवार, सागर खटके, अशोक
सातपुते, उद्धव जगदाळे, अंकुश ननवर, पृथ्वीराज भोसले, विशाल ठोंबरे, बाळू सातपुते, भाऊ भोसले, पै.योगेश सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.