एसटी महामंडळाकडून आरटीओ च्या नियमांच उल्लंघन – प्रवीण अवचर
करमाळा प्रतिनिधी
राज्य शासनाकडून एसटीमध्ये 75 वर्ष पूर्ण जेष्ठ नागरिकांना मोफत तसेच राज्यातील सर्व महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली, त्यामुळे एसटीकडे प्रवाशांची मोठी गर्दी होऊ लागली, परंतु प्रवाशांच्या मानाने एसटी महामंडळाकडे असणाऱ्या बसेस चे प्रमाण कमी आहे, यातच तालुक्या च्या ठिकाणी आगारांमध्ये मोडकळीस आलेल्या बसेस मोठ्या प्रमाणात असून
लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तालुक्याच्या आगारातून मोडकळीस आलेल्या बसेसचा वापर करण्यात येत आहे, अक्षरशः बसेसच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या प्रवाशांना बसण्याच्या जागी सीट बाकडे तुटलेले, बसेसचे पत्रे तुटलेले आशा बसेस एस टी महामंडळ वापरात आणत आहे. अपवाद पुणे मुंबई सारख्या ठिकाणी वातानुकूलित व सुस्थितीत असणारे बसेसचा वापर
होतो, परंतु तालुक्याच्या ठिकाणी सर्रास नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या बसेस वापर करण्यात येत आहेत. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, अनधिकृत ढाब्यांवरती वरती बसेस जेवण नाश्त्यासाठी उभा करणे, मोडकळीस आलेल्या बसेस अति वेगाने चालवणे, अशा एक ना अनेक प्रकारे वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होत असून याकडे आरटीओ
विभागाने ताबडतोब लक्ष देऊन… प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा एसटी बस व त्या आगारा मधील कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अवचर यांनी केलेली आहे.