थकीत झालेल्या कर्ज रकमेची फेड ओ. टी. एस. योजनेद्वारे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहराची आर्थिक नाडी असलेली करमाळा अर्बन बँक कोरोना काळातील थकबाकीमुळे अडचणीत आली त्याचा परिणाम रिझर्व बँकेने कारवाई करून प्रशासकाची नियुक्ती केली. दिलीप तिजोरे यांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारताच बँकेच्या अंतर्गत कमतरते बरोबरच थकबाकी वसुलीचा धडाका लावला. जुनी कर्ज खाते तत्पर वसूल होने कामे शासनाची दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी ची नागरी सहकारी बँकांना लागू केलेली. एक रकमी कर्ज परतफेड योजना बँकेने स्वीकारून
आज अखेर 45 लाखाची वसुली केलेली आहे. जून महिना अखेर एक कोटीचे टार्गेट असून 31 जुलै अखेर तीन कोटीचे वसुलीचे टार्गेट आहे. शासनाची दिनांक 27 एप्रिल 2023 ची ओटीएस योजना बँकेच्या थकीत कर्जदारांना फायद्याचे असून त्या कर्जदारांनी या योजनेचा लवकरात लवकर फायदा घेऊन आपली थकीत कर्ज खाती बंद करण्याचे आव्हान प्रशासक दिलीप तिजोरे यांनी केलेले आहे. या योजनेच्या अनुषंगाने जे थकीत कर्जदार मयत झालेले आहेत त्यांच्या नातलगांनी थकीत
कर्जदारा चा मृत्यूचा दाखला बँकेत सादर करून या ओ.टी.एस. योजनेचा लाभ घ्यावा कारण मृत्यू पावलेल्या कर्जदारांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तसेच इतर कर्जदारांच्या अनुषंगाने जी कर्ज खाती अनू उत्पादक झालेली आहेत व जी कर्ज खाती थकबाकी होऊन दोन वर्ष झालेली आहेत असा कर्ज खात्याचा दोन वर्षाचा थकीत चा बॅलन्स व त्यापुढील तीन वर्षाचे 6 टक्क्याने व्याज आकारून थकीत येणे बाकी अधिक सहा टक्क्याने येणारे व्याज अशी एकूण रक्कम तडजोड रक्कम राहणार आहे त्यामुळे या योजनेच्या अनुषंगाने बँकेपेक्षा कर्जदाराचा जास्त फायदा होणार आहे. सदर ओ. टी. एस. योजनेची
मुदत 30 जून अखेर संपुष्टात येणार असून ओटीएस योजनेचा लाभ न घेणाऱ्या कर्जदारांना सूचित करण्यात येते की ओटीएस ही योजना संपुष्टात येताच उर्वरित थकीत कर्जदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्या बँकेकडे तारण असलेल्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून त्यांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करून थकीत कर्जाची वसुली करण्यात येईल व जे कर्जदार त्यांच्याकडे असणारी मोठ्या रकमेची कर्जबाकी ओटीएस योजनेच्या अंतर्गत भरून कर्ज खाते बंद करतील त्यांचा
बँकेच्या वतीने सत्कार करण्यात येईल. बँकेची असणारी कर्ज थकबाकी लवकरात लवकर भरून बँकेस कर्जदाराने सहकार्य करावे. 31 जुलै 2023 अखेर जास्तीत जास्त कर्जाची वसुली करून बँक पूर्व पदावर येणे कामी प्रशासक दिलीप तिजोरे व बँकेतील सर्व स्टाफ दिवस-रात्र थकीत कर्जदारांच्या गाठीभेटी घेत आहे. कर्जदारांचे सहकार्य व बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि केलेल्या नियोजनाद्वारे बँक नक्कीच पूर्वपदावर येणार असून बँकेच्या ठेवीदारांनाही एक सुखद असा दिलासा मिळणार आहे.
…..
प्रकाश आसराजी कांबळे यांनी करमाळा अर्बन बँकेकडून मालमत्ता तारण कर्ज बारा लाख घेतलेले होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांचे कर्ज खाते थकीत झाले. थकीत झालेल्या कर्ज रकमेची फेड त्यांनी ओ. टी. एस. योजनेद्वारे केल्यामुळे प्रशासक यांनी त्यांचा सत्कार केला.
….