महाराष्ट्राचा पारंपरिक वारसा जोपासा – प्रियांका गायकवाड
करमाळा प्रतिनिधी
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख तथा शिवकन्या अकॅडमी च्या संस्थापिका प्रियांका गायकवाड यांनी महिलांसाठी लेझीम या पारंपरिक अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याबाबत गायकवाड यांनी सांगितले की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आजमितीला आपण अभिमानाने पाहत आहोत. महाराष्ट्र राज्य हे विविध सांस्कृतिक वारसा जपत असलेले राज्य म्हणून जगभरात ओळखले जाते. त्यामुळे आज करमाळा शहरात प्रथमच
महिलांसाठी पारंपरिक असे लेझीम पथक तयार करण्यात आले असून महाराष्ट्र दिनानिमित्त त्याचे सादरीकरण करण्यात आले. या आगोदरही आम्ही वटपौर्णिमा, संक्रात, नागपंचमी, मंगळागौर, गुढीपाडवा, इ. महाराष्ट्रीयन सण उत्साहपूर्ण साजरे केले असुन यापुढे ही महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी महिलांनी सुंदर अशी लेझीम खेळून उपस्थित महिलांची मने जिंकली.