
खासदार निंबाळकर यांच्या निधीतून करमाळ्यातील विविध रस्त्याची कामे मंजूर
करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या निधीतून करमाळा तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी ते निर्मळ वस्ती चिखलठाण फाटा या रस्त्यासाठी 10 लाख रुपये, पोंधवडी ते उमरड रस्त्यासाठी 20 लाख रुपये, खादगाव ते गुळवे वस्ती रस्त्यासाठी 15 लाख रुपये, वीट ते देवळाली रस्त्यासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या मंजूर कामामुळे या परिसरातील रस्त्याचे प्रश्न मार्गी लागल्याचे गणेश चिवटे यांनी म्हटले आहे.

