अर्जुन सरक यांचा सेवापुर्तीचा एवढा मोठा कार्यक्रमा मागचे गौडबंगाल काय – माजी प्राचार्य अनिल पाटील

जेऊर प्रतिनिधी

कधीच कोनच्या शिक्षकाचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम झाला नाही. अर्जुन सरक यांचा सेवापुर्तीचा एवढा मोठा कार्यक्रमा मागचे गौडबंगाल काय आहे. असा प्रश्न माजी प्राचार्य अनिल पाटील यांनी विचारला आहे.

ते म्हणाले, भारत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेसाठी आम्ही सुरूवाती पासून जिवाचे रान केले संस्था टिकली पाहिजे हीच आमची भावना आहे परंतु नारायण पाटील आमचे बंधु त्यांना चुकीची साथ देत आहे असा मोठा कार्यक्रम घेणे

योग्य नाही शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे संस्थेचा पैसा नाहक सरक यांचा कार्यक्रम मोठा घेऊन पैसा खर्च केला आहे. या आगोदर मी सेवानिवृत्त झालो आहे, तेंव्हा एवढा खर्च केला नाही माझ्या आगोदर कित्येक शिक्षक सेवानिवृत्त झाले तेंव्हा केला नाही. यांच्या कार्यक्रमाला जि.प.पं.स. आमदार नेते मंडळी आदी मान्यवर उपस्थित होते. सेवानिवृत्त कार्यक्रम होता का राजकीय कार्यक्रम होता. मी प्राचार्य होणार होतो त्यावेळी मला खुप त्रास दिला होता. त्यांनी बोगस नोकर

भरती केली प्राध्यापक बोगस पीएचडी बोगस याची चौकशी व्हावी असे सांगत पाटील यांनी सरक यांच्या कारभारा बाबत खंत व्यक्त केली आहे.

…..

संस्थेचा कारभार पुर्ण पारदर्शक आहे मा. आ. नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करीत आहोत सेवानिवृत्त खर्च मी स्वतः माझ्या पैशातून केला आहे. कामकाज करताना काही विघ्नसंतोषी लोक असतातच – प्रा. अर्जुन सरक सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ, जेऊर ता. करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *