श्री आदिनाथ साखर कारखान्याचा २२ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या वर विश्वास दाखवून कारखाना गळीत हंगाम सुरू करण्यास मोलाची साथ दिली त्यामुळेच आदिनाथ गाळप करु शकला आहे यासाठी ऊस उत्पादक शेतकरी यांनी तसेच उस तोडणी वहातूक यंत्रणेने कोणत्याही प्रकारचा आडव्हान्स न घेता विश्वासाने ऊस पूरवठा केला आहे त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र रहाणेसाठी कारखान्याने ऊस बिलाची रक्कम तसेच तोडणी वहातूक यंत्रणेची रक्कम रोखीने अदा केली आहे अशा प्रकारे रोखीने पेमेंट अदा करणारा आदिनाथ महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ठरला आहे ही आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट
ठरली आहे. कारखाना सुरळीत चालू करणेसाठी अधिकारी व कामगार बंधूंनी बहुमोल सहकार्य केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी आदिनाथ कारखाना सहकारी तत्वावर चालू रहाणे साठी मोलाचे सहकार्य केले आहे यासाठी मी संचालक मंडळाचे वतीने सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो असे प्रतिपादन चेअरमन धनंजय डोंगरे यांनी कारखान्याचे गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी केले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले करमाळा तालुक्यातील ऊस क्षेत्र आटोक्यात आल्या मुळे आदिनाथ कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ २२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झालेला आहे कारखान्यामध्ये या हंगामात ७६८८५ मे. टन गळीत
झाले आहे. आज २२ फेब्रुवारी रोजी गाळप झालेल्या ऊसाचे व तोडणी वहातूक बिलाचे चेक तीन दिवसात घेऊन जावेत असे त्यांनी सांगितले आहे. आदिनाथ कारखाना हे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे वैभव आहे व या पवित्र सहकाराचे मंदिरामध्ये आम्ही सर्वांचे सहकार्याने मिळून काम करीत आहोत आदिनाथ कारखाना ही करमाळा तालुक्यातील पहिली सहकारी संस्था असून ही संस्था सहकारी तत्वावर चालू रहावी आणि आदिनाथ कारखाना सुरू व्हावा ही तमाम सभासदांची इच्छा होती मागील तीन वर्ष आदिनाथ कारखाना बंद असल्याने या हंगामामध्ये कारखाना चालू होणार नाही अशी
परिस्थिती असताना तालुक्यातील सभासदांच्या विश्वासपात्र सहकार्यामुळेच आम्ही कारखाना चालू करु शकलो आहोत यासाठी आम्हाला माजी आमदार नारायण आबा पाटील, तसेच आमच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांचे मार्गदर्शन लाभले आहे ही आनंददायी बाब ठरली आहे. हे केवळ आम्ही शक्य करु शकलो ते आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने ही गोष्ट आम्ही विसरू शकत नाही असे त्यांनी पुढे म्हटले आहे. यावेळी व्हा. चेअरमन रमेश कांबळे, संचालक नितीन जगदाळे, नानासाहेब लोकरे, डॉ. हरिदास केवारे,रामचंद्र पवार, चंद्रहास निमगीरे, अविनाश वळेकर, पांडुरंग जाधव, लक्ष्मण गोडगे, प्रकाश झिंझाडे, नामदेव भोगे, पोपट सरडे,सचिन पांढरे, सौ. स्मिता राजेंद्र पवार, सौ. भामाबाई दिलीप केकाण यांचेसह कार्यकारी संचालक अरुण बागनवर ओ एस डी हरिदास डांगे,वर्क्स मॅनेजर प्रल्हाद आटोळे, चिफ केमिस्ट राजाराम खाडे, मुख्य शेती अधिकारी दीपक खटके, चिफ अकौंटंट सतिश पोळ, कार्यालय अधिक्षक मधुकर कदम, सिव्हिल इंजिनिअर सुभाष अभंग, इलेक्ट्रीक इंजीनियर दिपक देशमुख, स्टोअरकिपर शरद काकडे इत्यादी उपस्थित होते.
….
सकाळी आदिनाथ साखर कारखान्याचे व्हा चेअरमन रमेश कांबळे त्यांची पत्नी, मुलगा, सुन,नाती सह परिवाराच्या हस्ते प्रथम कारखाना स्थळावर सत्यनारायण पूजा संपन्न झाली होती