मातृभाषे एवढीच ज्ञानभाषा इंग्रजी महत्वाची – प्रा.गणेश करे-पाटील
करमाळा/प्रतिनिधि
इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देते. करीअरसाठी जगाचे दरवाजे खुले करते असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत प्रा.करे पाटील बोलत होते. करमाळा तालुका इंग्रजी आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याचे यशकल्याणी सेवाभवन येथे यशस्वी आयोजन करण्यात आले .यानिमित्ताने पंचायत समिती शिक्षण विभाग, करमाळा इंग्लीश टीचर्स असोशिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील इंग्रजी विषय शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेदरम्यान पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारती पूणे येथील तज्ञ मार्गदर्शक डॉ. श्रुती चौधरी, व डायट वेळापूरचे विषय समन्वयक प्रा.सुलतानचांद शेख, प्रा. शहाजी ठोंबरे, प्रा. गुरुनाथ मुंचंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे प्रा.गणेश करे-पाटील यांचे शिक्षक व निवडक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान झाले. प्रा. गणेश करे- पाटील यांना कर्मवीर भाऊराव पाटील समाजसुधारक पुरस्काराने प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवा कार्याचा गौरव करण्यात आला. विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
यशकल्याणी सेवाभवनच्या भव्य व सूसज्ज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ.अॅड. बाबुराव हिरडे, करमाळा गटविकास अधिकारी , सायन्सवॉल उपक्रमाचे प्रणेते श्री. मनोज राऊत साहेब, पं.समिती करमाळाचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील सरांची मार्गदर्शनपर मनोगते झाली.
नूतन माध्यमिक विद्यालय, केमचे विजयकुमार वनवे
यांना तालुकास्तरीय आयडियल इंग्लिश टीचर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कमलादेवी कन्या विद्यालय, करमाळाचे भीष्माचार्य चांदणे यांना
व्हर्साटाईल पर्सनॅलिटी अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, वीटचे मारुती किरवे यांना जिल्हास्तरीय आयडियल इंग्लिश टीचर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती
झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. बाळकृष्ण लावंड (लालबहादूर शास्त्री विद्यालय, सालसे), विजय कोळेकर (पंडित जवाहरलाल नेहरू
विद्यालय, रावगाव), श्रीमती शेलार (कमलादेवी कन्या विद्यालय, करमाळा), गंगाराम भोसले (मच्छिंद्र
नुस्ते विद्यालय, पांगरे- कविटगाव यांच्यासह शशिकांत गोमे ( प्रगती विद्यालय, मांग), कल्याणराव साळुंके (दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज), मारुती जाधव (महात्मा गांधी विद्यालय, करमाळा), शेंडे संतोष पांडुरंग (भारत हायस्कूल, जेऊर), पुरुषोत्तम माने (भैरवनाथ विद्यालय, जातेगाव) यांचा सत्कार
करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त इंग्रजी शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी निवृत्ती सुरवसे, श्री. फंड, संपतराव दिरंगे, शिवाजी काटुळे, भारत
पागळे, शालिनी भांगे, कदम, रोकडे,अशोक काटुळे, कल्पना राजूरकर यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन
गौरव करण्यात आला. इंग्रजी अध्यापक संघाचे
तालुकाध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक बाळकृष्ण लावंड व प्रा. विष्णू शिंदे
यांनी सूत्रसंचालन केले. तर मारुती किरवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसिद्धिप्रमुख
सुखदेव गिलबिले, सचिव गोपाळ तकीक-पाटील, मारुती जाधव, विजय खाडे, सुहास गलांडे, शरद शिंदे,
आदलिंग यांनी परिश्रम घेतले.