येणारा काळ राष्ट्रीय समाज पक्षासाठी चांगला आसेल – आमदार महादेव जानकर
जेआरडी माझा
………
माजी मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. करमाळा तालुका अध्यक्ष पदी जिवन होगले तर तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे व राजू ठोंबरे यांची तर महिला तालुका अध्यक्ष शारदा सुतार, व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष पदी जहाॅगीर पठाण, पांडे जिल्हा परिषद गट प्रमुख आप्पा पांढरे यांच्या निवडी करण्यात आल्या.
……….
“जिसकी संख्या भारी, ऊसकी उतनी भागिदारी” या धोरणानुसार राष्ट्रातील सर्व समाजाला सोबत घेऊनच पक्षाची वाटचाल सुरू आहे. पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे. रासपचा मुख्यमंत्री पंतप्रधान कसा होईल हे आमचे ध्येय धोरण आहे.
आम्हाला विचारल्या शिवाय पुढचा मुख्यमंत्री बनणार नाही आसा बंदोबस्त करू.असे वक्तव्य रासप आढावा बैठकीत करमाळा येथे महादेव जानकर यांनी केले.
यावेळी राज्याचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर,प्रभारी परमेश्वर पुजारी,जिल्हा उपाध्यक्ष गोरख वाकडे, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी देखिल रासप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले की,मी मंत्री असताना सर्वाधिक दूधाला दर दिला. आपण कष्ट करतो आणि फळं दूसरीच खात्यात. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहीजेत. त्यासाठी वन बुथ टेन युथ ची संकल्पना घेऊन जिल्हा परिषद,पंचायत समिती,व नगरपालिकेसाठी प्रभारी, गट-गणप्रमुखांची नेमणूक करावी. सर्व समाजाला सोबत घेऊन गावागावात कार्यकर्ता जोडला पाहीजे. राष्ट्रीय समाज पक्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. गाव तीथं शाखा तसेच विविध प्रकारच्या सर्व आघाड्या स्थापन कराव्यात.
काँग्रेस,भाजपची धोरणे वेगळी आहेत.आमदार,खासदार फोडणे, वापरणे आणि सोडून देणे,हे त्यांचे धोरण आहे.ते जास्त काळ टिकणार नाही. दोन्ही पक्ष बहुजनांचे नाहीत. आपला रस्ता मात्र फारच वेगळा आहे. रासपचे आज दोन आमदार आहेत. उद्या २५ होतील. काही खासदार होतील. आज रासपची ताकद वाढत आहे. रासपचाच पंतप्रधान होईल. त्यासाठी मला कुणाचाही आधार घ्यावा लागला तरी चालेल,’ असंही जानकर म्हणाले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर,जिल्हा उपाध्यक्ष गोरख वाकडे,प्रभारी परमेश्वर पुजारी,जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, जेष्ठ नेते चंद्रकांत खताळ,बाळासाहेब टकले ,इंजि.प्रकाश कोळेकर, विधानसभा अध्यक्ष शंकर सुळ,माजी तालुका अध्यक्ष भैरू सलगर,जहाॅगीर पठाण,राजू ठोंबरे, प्रशांत शिंदे,जगन्नाथ सलगर,अविन पाटील,चंद्रशेखर पाटील, डाॅ.भाग्यवंत बंडगर,शहाजी धेंडे,प्रविण होगले,रावसाहेब बिनवडे,विठ्ठल खांडेकर,रघूवीर खटके, विठ्ठल भिसे,शंकर राऊत, राजेंद्र जाधव,राहूल वायकुळे,विकास मेरगळ, दादा ननवरे,नानासाहेब खताळ,दादा खोमणे,शिवाजी पवार,दिपक कडू इत्यादी सह असंख्य रासप पदाधिकारी कार्यक्रते उपस्थितीत होते.