इरा पब्लिक स्कूल मध्ये “बालिका दिन”साजरा
आज इरा पब्लिक स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केडगाव च्या सरपंच सौ. वर्षा ज्ञानेश्वर पवार ताई होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ. अवसरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थिनींनी भारतातील वेगवेगळ्या महिलांच्या वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले,जिजाऊ ,राणी लक्ष्मीबाई,डॉक्टर आनंदी बाई जोशी, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटिल, सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा अशा प्रतिभावंत महिलांच्या भूमिका सादर करण्यात आल्या.
या वेळी उपस्थित विद्यार्थिनींनी या महान महिलांच्या कार्याची माहिती आपल्या वेशभूषेतून व भाषणाने सांगण्याचा छानसा प्रयत्न केला.
यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम सादर करण्यात आला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुलकर्णी मॅडम यांनी केले तर सौ .पाटकुलकर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाची तयारी पासून ते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व महिला शिक्षिकांनी अथक परिश्रम घेतले.