
करमाळा प्रतिनिधी
पोथरे तालुका करमाळा येथील अष्टविनायक गणेश तरून मंडळाने गणेश विसर्जनाची मिरवणूक ही डीजे बँजो न लावता टाळ मृदंगाच्या ठेक्यावर काढण्यात आली. टाळाच्या घोषात व मृदंगाच्या ठेकात पावली खेळत आनंदी वातावरणामध्ये ही मिरवणूक निघाली. या दिंडीत डोक्यावरती कलश घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. गणपती बाप्पा मोरया म्हणत

मृदंगाच्या तालावर आनंद व्यक्त करण्यात आला. अष्टविनायक तरुण मंडळांनी पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्याने सर्वत्र मंडळाचे कौतुक केले जात आहे. टाळ मृदंगासाठी हनुमान भजनी मंडळांनी साथ संगत केली. उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या मिरवणुकीसाठी अष्टविनायक तरुण मंडळातील सुधीर झिंजाडे, चंद्रकांत झिंजाडे, आबा झिंजडे, सुदाम झिंजाडे, वैभव झिंजाडे, रवी झिंजाडे, अमोल झिंजाडे, महादेव झिंजाडे, मोहीत झिंजाडे, यांनी परिश्रम घेतले.