भारत शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी 4 जानेवारी रोजी होणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जून सरक यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की यावर्षी भारत शैक्षणिक संकुलाचे 63 वे वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून बुधवारी दुपारी 2 वाजता प्रशालेच्या क्रीडांगणावर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव उर्फ नानासाहेब देवकाते-पाटील (बारामती) यांच्या
अध्यक्षतेखाली हे स्नेहसंमेलन होणार असून प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंद पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा समाजसेवक डाॅ. सुभाष सुराणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष नारायण (आबा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन पार पडत असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावणार आहेत. सदर स्नेहसंमेलनाची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी 4 जानेवारी रोजी दु 2 ते 5:30 या
वेळेत पारितोषिक वितरण व प्रमुख वक्ते भाषण करणार आहेत. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचा वार्षिक अहवाल पालक व विद्यार्थ्यांसमोर मांडला जाणार आहे. तर गुरुवार 5 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 5:30 दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शनाच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्नेहसंमेलनास सर्व पालक व जेऊर परिसरातील संस्था हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव प्रा. अर्जून सरक यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अनंत शिंगाडे, भारत हायस्कूलचे प्राचार्य केशव दहिभाते, भारत प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे तसेच स्नेहसंमेलन शिक्षक चिटणीस हनुमंत रुपनर सर उपस्थित होते.