चांदगुडे गल्ली परिसरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिक हैराण झाले आहे दुषित पाणी प्यावे लागत आहे
करमाळा प्रतिनिधी
चांदगुडे गल्ली परिसरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिक हैराण झाले आहे दुषित पाणी प्यावे लागत आहे अशी माहिती भाऊसाहेब चांदगुडे यांनी दिली आहे
रस्ता हा नेटके हॉस्पीटल ,चांदगुडे गल्ली कडे येणारा असून 2 महिने होऊन गेले तरी त्या कडे नगर परिषद प्रशासन लक्ष देत नाही.
मोठ्या गाड्या जाऊन रोड तर खराब झालाच आहे. शिवाय अता पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून 1 महिना झाल गटारीच पाणी मिक्स होऊन दुषित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या परिसरातील नागरिकांना खुप त्रास होत आहे रस्ते खराब, पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन फुटली,घाणीचे साम्राज्य आरोग्य धोकादायक झाले आहे नागरिकांना नरक
यातना सहन करावा लागत आहे त्वरित पाईपलाईन दुरुस्त करावी अन्यथा या भागातील नागरिकांना घेऊन नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई बाबत कलेक्टर सो यांना भेटले जाईल असे चांदगुडे यांनी सांगितले आहे