जेऊर येथील जिनियस अबॅकस सेंटर ची पुण्यात गगनभरारी
महाराष्ट्र राज्यातील 7 जिल्ह्य़ातून पुणे येथे 29/12/2022 रोजी झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत 8750 विद्यार्थी मधुन कु.ईश्वरी सोमनाथ काशिद इयत्ता 3 री.ही लेवल 1च्या परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवून विनर झाली.तसेच लिटिल चॅम्प लेवल मधे असरलान जावेद फकीर इयत्ता-2री हा 5 व्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे तसेच लेव्हल 1 च्या परीक्षेत अंजनडोह येथील श्रीराम केतन पाटील इयत्ता-4 थी चौथ्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे.8450 विद्यार्थी मधुन वरील 3 विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल लेवल परिक्षेत साठी निवड झाली आहे.


ईश्वरी ,श्रीराम आरसलानचे खूप खूप अभिनंदन. तसेच 22 विद्यार्थी गोल्ड मेल्डलिस्ट मिळवुन यशस्वी झाले आहेत. लिटिल चॅम्प लेवल मधे दर्श रंदवे, उमेरा फकीर, सिद्धी गुळवे,गौरी शिंदे , तनिष्क सुर वसे, रणवीर पाटील, शाश्वत सुतार हे विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट ठरले.लेवल 1 च्या परीक्षेत पार्थ वाघमोडे , शौर्यतेज रोकडे, सुयश चव्हाण, श्रुति गुंडगिरे , अनन्या मंजरतकर,शिवतेज मंजरतकर, यांना ही गोल्ड मेडल्स भेटले तसेच लेवल 2 च्या परीक्षेत ईशान फकीर, आरोही पाटील, अनन्या पाटील,शारण्या साळुंखे, आदित्या पाटील, हे देखील गोल्डमिस्ट ठरलें आहेत.तसेच लेवल 3 च्या परीक्षेत वेदांती निमगिरे, रिदा फकीर या देखील गोल्डमिस्ट च्या मानकरी ठरल्या आहेत.


वरील सर्व विद्यार्थ्यांना जिनियस क्लासच्या संचालिका. कु.अंकिता वेदपाठक मॅडम व मुलांचे आई वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन भेटले. तसेच प्रोअक्टिव कंपनी चे डायरेक्ट अजय मणियार सर, गिरीश करडे सर संचालिका .सारिका करडे मॅडम, ज्योती मणियार मॅडम, तसेच हेड ऑफ डिपार्टमेंट च्या.तेजस्विनी सावंत मॅडम. तसेच रेखा मॅडम, प्राजक्ताi मॅडम, आद्या करडे याचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल सर्वांचे खूप खुप आभार.
पुढील परिक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व जिनियस अबॅकस सेंटर ला बेस्ट सेंटर अवॉर्ड देण्यात आला

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *