करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत गटाचे विलास ज्ञानदेव दळवी यांची बिनविरोध निवड झाली.

आज सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बेंडारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी विलास ज्ञानदेव दळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक ज्ञानदेव मुरुमकर, गोकुळ दळवी, शिवाजी बाबर, बापू घोडके, अभिजित वाघमोडे, प्रशांत पवार, दत्ता वाघमोडे, संदीप वाघमोडे, सिंधूबाई मुरुमकर, मिनाक्षी निकम, सचिव अनिल माने उपस्थित होते.

निवड झाल्यानंतर नुतन चेअरमन विलास दळवी यांचा सत्कार सावंत गटाचे मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गोपाळ बापू सावंत, आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांचे संचालक ऍड. राहुल सावंत, सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, सरपंच दौलत वाघमोडे, माजी सरपंच महारुद्र दळवी, उपसरपंच गणेश जाधव, आदी जण उपस्थित होते.

निवड झाल्यानंतर हनुमंत सावंत, अशोक मुरुमकर, भाऊसाहेब मुरुमकर, बबन मुरुमकर,  महादेव गवळी, शिवाजी दळवी, गौतम दळवी, गणेश मुरुमकर, लोकेश वाघमोडे, तुषार मुरुमकर,  दादासाहेब नलवडे, रामहरी दळवी, अभिजित वाघमोडे, हरी मोरे, हावीन गायकवाड, शरद वाडेकर, संकेत वाघमोडे, महेश मुरुमकर, शरद दळवी आदींनी जल्लोष केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *