
करमाळा प्रतिनिधी
पद्म-पंडित प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त्त अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा केम येथील विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक ३१/७/२०२५ रोजी दुपारी १:०० वाजता मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटल वाटप होणार आहे.

हा कार्यक्रम पोलीस उपनिरीक्षक करमाळा अभिमान गुटाळ, केम मंडल अधिकारी मिरा नागटिळक, अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय केम अध्यक्ष मारुती पारखे, विद्यमान सरपंच व मा.जि. परिषद सदस्य विलासराव पाटील, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, चेअरमन सुदर्शन तळेकर, मुख्याध्यापक नितीन जगताप, सहशिक्षक देविदास यादव, आजी-माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रण पद्म पंडित प्रतिष्ठान, कंदर संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पंडित पवार यांनी दिले आहे.