करमाळा प्रतिनिधी

दि. ०६/१२/२०२४ रोजी फिर्यादी नामे अभिजीत जीवन सरडे, वयः २७ वर्षे, रा. कंदर, ता. करमाळा यांनी करमाळा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की, ०६/१२/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. ते दुपारी ०२:३० वा. चे दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे राहते घराच्या दरवाजाची कडी उचकटुन त्यांच्या घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम घरफोडी करुन चोरुन नेली आहे. वगैरे मजकुराची फिर्याद दिल्याने करामळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७८८/२०२४, भा. न्या.सं. कलम ३०५(अ), ३३१(३) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्हयाचा निरंतर तपास चालू आहे.

सदर गुन्हयाच्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा आरोपी नामे रामेश्वर जंगल्या भोसले, वयः २५ वर्षे, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड याने केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपी यास अटक करुन न्यायालयाकडुन त्याची पोलीस कोठडी रिमांड मंजुर करुन घेवुन त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरी केलेल्या दागीन्यापैकी १,५०,०००/- रु. किंमीतीची सोन्याची कर्नफुले व सोन्याची दुशी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. पोलीस निरीक्षक रणजीत माने, म.सहा.पोलीस निरीक्षक गीरीजा म्हस्के, पो.उप. निरी. / प्रशांत मदने, पो. हवा. / १६४८ अजीत उबाळे, पो. ना. / ९१२ वैभव ठेंगल, पो. ना. / ११६२ मनिष पवार, पो.शि. / ८४३ सोमनाथ गावडे, पोक / ६८९ योगेश येवले, पोका / १६७ मिलिंद दहिहांडे, पोका ८५६ अर्जुन गोसावी, पोका / १५२४ अमोल रंदिल, पोकों / ४३८ रविराज गटकुळ, सर्व नेम: करमाळा पोलीस ठाणे तसेच अंगुलीमुद्रा विभागाचे स.पो.नि. / गळवे व पो.शि. / व्यंकटेश मोरे, नेमः सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *