
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील देलवडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या आरव अमोल कोल्हे या विद्यार्थ्याने पहिली मध्ये विविध 10 प्रकारच्या प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.

योग्य मार्गदर्शन जिद्द व मेहनतीच्या जोरावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही अलौकिक असे यश प्राप्त करू शकतो हेच आरव ने मिळवलेल्या यशातून दिसून येते. लहानपणाचा मनसोक्त आनंद घेत हसत खेळत शिक्षण हे फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळते. शिक्षणाच्या ओझ्याखाली बालपण न हरवता हसत खेळत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी त्याने केली. इयत्ता पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांचे तयारी करून घेतल्यामुळे सर्व स्पर्धांमध्ये त्याने उत्तुंग यश मिळवले आहे. त्याचबरोबर अबॅकस सध्या शिकत असून अबॅकस नॅशनल लेवल मध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आरवने जिल्हा परिषद शाळेत शिकून मिळवलेली ही गुणवत्ता इंग्रजी व इंटरनॅशनल शाळेसाठी आग्रही असणाऱ्या पालकांसाठी आदर्श घालून देणारी आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व काही गोष्टी विनामूल्य असून मुलांचीही तितकीच काळजी घेतली जाते त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शिक्षक अगदी तळमळीने प्रयत्न करतात.
शिक्षिका छाया लडकत यांनी खूप मेहनत घेतली तसेच त्याला राजु भोंग सरांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.
त्याच्या या यशाबद्दल जयवंत नलावडे गटशिक्षणाधिकारी, नितीन कदम शिक्षण विस्ताराधिकारी, महावीर गोरे सर केंद्रप्रमुख तसेच देलवडीचे सरपंच रेखाताई ढवळे, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष श्रीकृष्ण ढवळे, आशाताई गोविंदे या सर्वांनी आरव चे अभिनंदन केले.
शैक्षणिक वर्ष 2024-25
मंथन 150 पैकी 146 गुण राज्यात तिसरा
जीटीएस 100 पैकी 96 गुण राज्यात तिसरा
एक्सलंट ओलंपियाड एक्झाम 200 पैकी 188 गुण राज्यात तिसरा
बीटीएस दीडशे पैकी 122 गुण सोलापूर जिल्ह्यात प्रथम
अभिरुप परीक्षा 150 पैकी 138 सोलापूर जिल्ह्यात प्रथम
एटीएस परीक्षा 100 पैकी 94 सोलापूर मध्ये प्रथम
लक्षवेध 150 पैकी 132
पंढरपूर टॅलेंट सर्च 150 पैकी 136
बीडीएस शंभर पैकी 90 सिल्वर मेडल
अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक