
करमाळा प्रतिनिधी
दि. 04 एप्रिल 2025- करमाळा तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिनियर के. जी. पूर्ण केलेल्या विद्यार्थांचा पदवी प्रदान समारंभ आयोजित केला गेला. या कार्यक्रमात सर्वच विद्यार्थांनी इंग्रजीमधून अतिशय सूंदर मनोगते व्यक्त करुन प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमासाठी पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे टाळयांच्या गजरात कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

\संस्थेच्या वतीने पुढील वर्षी इ. पाहिलीमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध लेखिका व अनेक पुरस्कार सन्मानित अंजली श्रीवास्तव मॅडम व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून झरे गावच्या नूतन सरपंच तसेच कमलाई स्किल डेव्हलोपमेंट करमाळा च्या संस्थापिका मंजुश्री मुसळे मॅडम उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध लेखिका श्रीवास्तव मॅडम व नूतन सरपंच मुसळे मॅडम यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनभरून कौतुक केले. अनमोल मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये सर्वच विद्यार्थी, पालक वर्ग व सर्व शिक्षक स्टाफ यांचा उत्साह अतुलनीय होता. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापिका अमृता परदेशी मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक कादगे मॅडम व आभार प्रदर्शन वर्गशिक्षिका रजनी परदेशी मॅडम यांनी केले.