
करमाळा प्रतिनिधी
८ मार्च महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्यरत आणि सेवेत असणाऱ्या मान्यवर महिलांचा गुणगौरव सोहळा आणि ज्योती सावित्री हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या दांम्पत्यास २५ मार्च रोजी ४ वा. केमिस्ट भवन येथे संपन्न होणार आहे.


सुमित्रा अक्का घोलप (राजकारण) करमाळा शहरातील भरीव विकासकामात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्वातून त्यांनी राजकारणात आपली छाप कायम ठेवली.

अलका कलढोणे (सेवानिवृत्त शिक्षिका) एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकाल त्यांनी उत्तम प्रकारे गाजवला.

रेखा दिलीप कटारिया (उद्योग क्षेत्र) पतीच्या जाण्यानं पुन्हा खंबीरपणं उभं राहून पाठीमागचा उद्योग विस्तार सांभाळणं खरंच कठीण.

सुनिता भोसले (आरोग्य विभाग परिचारिका) रुग्णांना दिलासा देत त्यांची सेवा करणं आणि सिस्टर नावाला साजेसं असणारं कार्य करणं खरंच कौतुकास्पद.

डॉ रेशमा भांबळ (आरोग्य विभाग) आज छोट्या रकमेत काय मिळतं ? पण तरीही अगदी माफक अल्पशा फी मध्ये त्या अगदी तळमळीनं रुग्ण उपचार करतात. ही सेवा खरंच दखलपात्र आहे.

मंजुश्री मुसळे (कमलाई अबॅकस क्लास) विद्यार्थ्यांना एका उंचीवर पोहचवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणा-या मंजू मुसळे यांचे कौतुक खरंच व्हायला हवं.

जहिरा पठाण (धुणीभांडी सेवा देणाऱ्या ताई) काम कोणतेही असो ते झोकून देऊन त्याला न्याय देता आला पाहिजे आणि संसाराला हातभार लावता आला पाहिजे तसेच विनोदी कलाकार म्हणून ही त्यांची ओळख आहे.

ज्योती सावित्री सन्मान पुरस्कार जयंत दळवी आणि धनश्री दळवी यांना दिला जातो आहे. तू समाजातील तळागाळातील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा दे मी तुझ्या पाठीशी आहे अशी फूल्यांची विचारधारा जपणारं हे जोडपं.
महिलांसाठी विविध वेशभूषा सादरीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गिरिजा मस्के (API), शितल करेपाटील (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ कविता कांबळे, डॉ. वर्षा करंजकर, डॉ.अपर्णा भोसले यांच्या उपस्थितीत हा गौरवसोहळा संपन्न होतोय.
तसेच महिला दिनानिमित्त दरवर्षी असे पुरस्कार देऊन आम्ही महिलांचा सन्मान करणार आहोत असे मत सामाजिक कार्यकर्त्या म़ंडळाच्या अध्यक्षा अंजली राठोड श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.