करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा होत असल्याने कार्यक्रमाची तयारी सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी केली होती. सर्व प्रथम
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्या नंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थिनी बालिका दिन असल्या कारणाने सावित्रीबाईंच्या वेशभूषेत स्कूल मध्ये आल्या होत्या.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.