सोलापूर दि.२8 (जिमाका):- सन २०२५ या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केल्या आहे. सन २०२५ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
यामध्ये मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रात, सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना, सोमवार दि.20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी या सुट्ट्यांचा समावेश आहे.
या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय, कोषागार कार्यालये यांना लागू राहतील.