करमाळा प्रतिनिधी
रायगाव एसटी बस अपघात प्रकरणी करमाळा मुख्य आगारप्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे असे निवेदन यशपाल कांबळे जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी सोलापूर यांनी करमाळा तहसीलदार व करमाळा पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 31/12/2024 रोजी करमाळा आगारची बस क्रमांक एम एच 13 सी यु 7883 कर्जत येथून प्रवासी घेऊन करमाळा परतीच्या मार्गावर येत असताना रावगाव येते स्टेरिंग रॉड तुटल्याने एसटी पलटी झाली असे प्रत्यक्षदर्शी आहे एसटी आगाराच्या कित्येक गाड्या नादुरुस्त आहेत त्यापैकी ही पण बस नादुरुस्त आगारप्रमुखामुळेच राहिलेले आहे. त्याचप्रमाणे याच एसटी बसचा दिनांक 22/8/2024 रोजी करमाळा कडून सोलापूरला निघालेली असताना सोलापूर येथील कोंडी या ठिकाणी टायर फुटला होता. चालकाच्या प्रसंगावधानाने एसटी मध्ये असलेले सर्व प्रवासी बचावले होते. त्यावेळी सुद्धा आगार प्रमुखांवर अपघात प्रकरणी कारवाई न झाल्यामुळे आगार प्रमुखांनी एसटी दुरुस्ती संदर्भातील बाब हलक्यात घेतली त्यामुळे आगार प्रमुखावर कारवाई होणे गरजेचे आहे. कदाचित त्यावेळी कारवाई झाली असती तर हा अपघात टळू शकला असता
तसेच एसटी स्थानकात कोणती एसटी वेळ वर उपलब्ध नसते त्यामुळे लहान मुले, महिला, शाळकरी विद्यार्थी, विद्यालयीन विद्यार्थी व वृद्ध नागरिक यांची होरपळ होते.
शाळा विद्यालय सुटल्यानंतर एसटीला उशीर झाल्यामुळे मुलींची छेड काढणे हे प्रकार घडत असतात यामुळे कित्येक मुलींचे आयुष्याचे नुकसान झालेले आहेत, पालकांनी शाळा बंद केल्या, होतकरू मुली असताना सुद्धा त्यांचे लवकर लग्न लावण्यात आले. वेळेवर एसटीची दुरुस्ती काम करणे एसटी बसेस वेळेवर सोडणे ही जबाबदारी पूर्णपणे आगारप्रमुखाचे असते त्यामुळे आगार प्रमुखावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे.
रावगाव येथील अपघात ग्रस्त एसटी बस क्रमांक एम एच 13 सी यु 7883 दिनांक 31/3/2024 रोजी संपलेला आहे अद्याप पर्यंत आरटीओ ची कारवाई का नाही? खाजगी वाहनांना जे नियमावली आहे तीच नियमावली प्रशासकीय वाहनांना सुद्धा आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची योजना आहे त्यामध्ये प्रवासाला अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये अंशता दुखापत एक ते अडीच लाख रुपये (दुखापतीनुसार) आणि मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येतात त्यामुळे आगार प्रमुखांनी तात्काळ ती मदत जाहीर करावी.
त्यामुळे करमाळा एसटी आगारात प्रमुखावर तात्काळ कारवाई करून, जखमी प्रवासी यांना व पुढील काळात अपघात होऊ नयेत व ते टाळले जावेत तात्काळ कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.
मागण्या पुढील प्रमाणे
रावगाव अपघात प्रकरणी करमाळा एसटी आगार प्रमुखावर चौकशी करून गुन्हा दाखल करून निलंबित, रावगाव एसटी अपघातातील सर्व प्रवासी यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ योजनेअंतर्गत करमाळा एसटी आगाराने आर्थिक मदत जाहीर करावी, करमाळा एसटी आगारातील अपघात ग्रस्त एसटी MH13/CU 7883 विमा संपलेला दंड आकारावा, व करमाळा आगारातील सर्व एसटी बसेसची आरटीओ यांनी पाहणी करून कारवाई करावी, विद्यालय मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून विद्यालय शाळा सुटलेल्या वेळीच एसटी बसेस सोडाव्यात अशा विविध मागण्या यशपाल कांबळे यांच्या वतीने करण्यात आल्या माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, परिवहन आयुक्त कार्यालय एमजी रोड फोर्ट मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा यांनाही निवेदने पाठवण्यात आली जर मागण्या मान्य न झाल्यास लवकरच एसटी रोको आंदोलन करण्याचा पवित्रा यशपाल कांबळे व सहकार्याने घेतला या सर्व प्रकरणातील सर्व मागण्यांना ब्ल्यू पॅंथर ग्रुप व बहुउद्देशीय सामाजिक संघटना चे संस्थापक आशुतोष भाऊ शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वतीने लेखी स्वरूपात जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी वंचित तालुकाध्यक्ष विलास कांबळे, रणजीत कांबळे, संदीप कांबळे, पप्पू ओहोळ, रोहन भोसले, मराठा आघाडीचे शिवाजी शिंदे, केतन बनसोडे, प्रवीण चव्हाण, आज्जू शेख, बंटी भडंगे, मयूर कांबळे, सुगत कांबळे, अमोल खराडे, विशाल गायकवाड, बापूराव गायकवाड, बादल बडेकर, शंभूराजे आहेर, सोहेल दारुवाले, आकाश धनवे, संतोष कांबळे, दीक्षांत लोंढे, दिनेश जांभळे, अभिजीत सूर्यवंशी, अलीम शेख, हेमंत भागवत, आसिफ शेख आदि जण उपस्थित होते.