करमाळा प्रतिनिधी

समरसता साहित्य परिषद सोलापूर जिल्हा सहकार्यवाहपदी दिनेश मडके यांची निवड महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष मार्गदर्शक जगन्नाथ हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माधव कुलकर्णी यांनी निवड जाहीर केली आहे.

अखिल भारतीय स्तरावर काम करणारी साहित्यिकांची चळवळ म्हणजे समरसता साहित्य परिषद म्हणून ओळखली जाते भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून वेगवेगळ्या भाषेमध्ये साहित्य प्रसिद्ध झालेले आहे परंतु देश, भाषा, राज्य, प्रांत, भौगोलिक रचना, चालीरीती, बोलीभाषा या गोष्टीपासून आपण अनभिज्ञ असतो यामुळे या ज्ञानापासून आपण कोसो दूर राहतो हे आपल्या पूर्वजांची पिढ्यांन पिढ्यांचे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे भाषांचा विस्तार व समृध्द होणे महत्वाचे आहे. तरच प्रगतीचे दारे उघडणार आहेत.

त्याचे आकलन नव्या पिढीला व्हावे यासाठी समरसता साहित्य परिषद राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये काम करत आहे या समरसता साहित्य परिषदेच्या वतीने जनजनापर्यंत पोहोचण्यासाठी साहित्य परिषद काम करणार आहे लवकरच करमाळा तालुका कार्यकारणी जाहीर करण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला.

दिनेश मडके हे गेल्या 18 ते 20 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. संपादक साप्ताहिक पवनपुत्र,  भाजपा अध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष, दैनिक जनसत्य‌, दैनिक तरुण भारत, संवाद‌ बेळगाव यामध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग ‌कुणबी मराठा सेवा संघाचे गेल्या सोळा वर्षापासून ‌तालुकाध्यक्ष म्हणून काम करत आहे.

करमाळा तालुका डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष म्हणुन त्यांनी चांगले काम केले असून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. मराठा समाजात विवाह जमण्याचा प्रश्न गंभीर बनला असून करमाळा तालुक्यात मराठा सोयरीक संघाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा सोयरीक संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष म्हणुन ते काम करीत आहेत. विविध सामाजिक चळवळीत ते सक्रियपणे सहभाग असल्याने त्यांना समाजातील सर्व क्षेत्रातील चांगला पाठिंबा मिळाला आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असुन दिनेश मडके यांची निवड झाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेश उपाध्यक्ष सतीश बापू सावंत, विजयराव पवार, मुकुंद साळुंके सर, शिवनाथ घोलप, नरेंद्रसिंह ठाकुर, हरिभाऊ हिरडे, दादासाहेब पिसे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत‌.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *