सोलापूर दि.२९ (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता २४४- करमाळा व २४५- माढा विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून अफसाना परवीन (भा.प्र.से.) यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक कालावधीत मा.सर्वसाधारण निरीक्षक अफसाना परवीन (भा.प्र.से.) यांचे वास्तव्य शासकीय विश्रामगृह, उजनी, ता. माढा येथे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९५६२४०६९०६ हा आहे.
नागरिकांना निवडणूक विषयक भेटायचे अथवा माहिती द्यावयाचे असल्यास मा. निरीक्षक यांचे वास्तव असलेल्या शासकीय विश्रामगृह, उजनी, ता. माढा येथे संपर्क साधता येईल. मा. निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून अनिकेत नंदकुमार शिंदे, उपनिबंधक, माढा असणार आहेत. संपर्क अधिकारी यांचा भ्रमणध्वनी क्र. ८३९०२५४४७४ आहे.