करमाळा प्रतिनिधी
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान व राजेश्वर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजेश्वर हॉस्पिटल कोर्टी येथे जवळपास ४५० लोकांना मोफत आंबा रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे मा. आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी भूषविले. यावेळी परिसरातील गरजूंना आंबा रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी राजेंद्र भोसले (सरपंच राजुरी), मनोहर कोडलिंगे (सरपंच पोंधवडी), सतीश शिंदे (उपसरपंच राजुरी), श्रीरंग मेहेर, भारतशेठ क्षीरसागर, प्रकाश पारखे, मंगेश अभंग सर, आबा अभंग, रुपचंद गावडे, शहाजी हुलगे, दिनकर हुलगे, बाबा महाराज हगारे, नवनाथ आखाडे, आबासाहेब टापरे, विजय महाराज अभंग, बंडू शिंदे, बाळू पारखे, नवनाथ दुरंदे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.