करमाळा प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य दिन हा देशाचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्म झाल्याची आठवण करतो. या दिवशी, सन 1947 मध्ये, ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 संमत करून भारतीय संविधान सभेला विधानसभेचे सार्वभौमत्व हस्तांतरित केले.
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक जयंत दळवी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका दळवी मॅडम तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीपप्रज्वनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्र ध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यानंतर छोट्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी ‘हम होंगे कामयाब’ हे गीत सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अशाप्रकारे अतिशय प्रसन्न वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उपस्थित होते.