सोलापूर दि.25(जिमाका):- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके आदी कृषि निविष्ठा खरेदी करतेवेळेस ज्यादा दराने विक्री करणे, खरेदीची पावती न देणे, एका निविष्ठेसोबत दुसरी निविष्ठा खरेदीसाठी सक्ती करणे, (लिकिंग) निविष्ठा उपलब्ध असतानाही विक्री न करणे, मुदतबाहय निविष्ठा विक्री करणे इत्यादी स्वरुपाच्या तक्रारी संबंधाने कृषि विभागाचा जिल्हास्तरावर 7219286928 हा व्हॉटस्अप नंबर सुरु करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांना अडचणी आल्यास त्यांनी नमुद व्हॉटस्अॅप नंबर वरती आपल्याकडील ठोस पुराव्यासह तक्रार करावी. त्यावर शहानिशा करुन आवश्यक ती कारवाई करणेत येईल असेही अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.