करमाळा प्रतिनिधी
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानवाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून गंभीर आजारांचा त्याला सामना करावा लागत असल्याने आरोग्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी योग हीच आरोग्य संपन्न आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ मॅडम यांनी व्यक्त केले. दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली ता. भिगवण दौंड
येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर, उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, सचिव मायाताई झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर यांनी सहभागी होत योगाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुढे बोलताना मायाताई झोळ मॅडम म्हणाल्या की, आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये इतरांच्या बरोबरीने स्पर्धेत टिकण्यासाठी
मनुष्य दिवस रात्र एक करून आपले ध्येय गाठण्यासाठी नुसता मृगजळामागे धावत सुटला आहे. यामुळे त्याचे आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असून आयुष्यभराची कमाई आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दवाखान्यामध्ये घालण्याची पाळी त्याच्यावर आले असल्याने कुंटुंबाची सर्व दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळेच मनुष्याने आपले शरीर ही संपत्ती म्हणून त्याचे आरोग्य टिकवण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने आपणास संजीवनी प्रमाणे ऋषीमुनींनी योगी प्राचीन विद्या आपणास दिली आहे. या विद्येचा उपयोग करून करो योग रहो निरोग या उक्तीचा जीवनात अवलंब करून दररोज योग करून आपले जीवन सुखी समृद्ध संपन्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाची प्रात्यक्षिक केले. या योग दिनाच्या शिबिरामध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न आयुष्य जगण्याचा संदेश दिला. दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.