करमाळा प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी शिक्षण प्रभावी माध्यम असून गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप करून त्यांच्या शिक्षणाला सहाय्य करण्याचा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया प्रमुख गणेश कराड यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांच्यावतीने करमाळा तालुक्यातील ब्राह्मण समाज तसेच इतर समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम करमाळा येथील कमलादेवी औद्योगिक वसाहत येथे संपन्न

झाला. यावेळी पुढे बोलताना गणेश कराड म्हणाले की, समाजामध्ये अनेक लोक आर्थिक दृष्ट्या संपन्न असूनही आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करणारी माणसे कमी आहेत जर यांनी प्रत्येकाने समाजातील गरजू वंचित लोकांना मदत केली तर सर्व समाज सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शैक्षणिक मदतीचा उपक्रम त्यातून या उपक्रमाचे अनुकरण करून समाजातील दानशूर व्यक्तींनी

अशा उपक्रमांना पाठबळ देणे काळाची गरज आहे. तसेच सामाजिक संघटनेने ही अशा उपक्रमाद्वारे भावी पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम राबविण्याचे आव्हान त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश कराड, भटक्या विमुक्त आदिवासी ज्ञानपीठ एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, पत्रकार राहुल रामदासी, उद्योजक मनोज कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा केंद्र अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र विद्वत, सचिव भारत घुगीकर काका, कार्याध्यक्ष महेश वैद्य, महिला आघाडीच्या अध्यक्षा निलीमाताई पुंडे, सामाजिक कार्यकर्ते किसन कांबळे गुरुजी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अतुल पाटील, राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, ग्रामपंचायत सदस्य शरद मोरे, बंडु शिंदे, वरकुटे शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा विद्वत, जेऊरचे दादासाहेब पाठक, विजय कुलकर्णी, उद्योजक शंकर कुलकर्णी, साहित्यिका मंजिरी जोशी, शुभम कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये करमाळा तालुक्यातील शंभर विद्यार्थ्यांना वह्या पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी म्हणाले की, दरवर्षी आपण हा उपक्रम राबवणार असून ब्राह्मण समाजाबरोबर इतरही समाजाला शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी फलटणचे चंदू दानी व पुणे येथून गंगाधर कुलकर्णी, वरकुटे येथून हरिभाऊ विद्वत यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्थिक सहाय्य केले. या कार्यक्रमासाठी शामल कुलकर्णी, वैष्णवी कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार दिनेश मडके यांनी केले. स्वागत ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र विद्वत यांनी केले तर आभार सचिव भारत घुगीकर काका यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *