करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धर्यशील मोहिते-पाटील यांचा आभार व कृतज्ञता संवाद मेळावा जिंती, वाशिंबे बरोबरच वीट, वांगी, करमाळा, केम येथे पार पडला.
त्यावेळी जिंती येथे बोलताना खासदार धर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रथमता करमाळा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले. आपल्या मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यास मी कटीबद्ध असुन जेऊर, पारेवाडी येथे रेल्वे गाडयांना थांबा मिळवून देणे, नारायण आबा पाटील यांना सोबत घेऊन रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावणे, करमाळा एम.आय.डी.सी. चा प्रश्न मार्गी लावून युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, कपात केलेली लाईट सुस्थितीत करणे, केळीसाठी संशोधन केंद्र उभारणे असे अनेक प्रश्न प्रलंबित असलेले मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मतदारसंघातील कामे करताना जेव्हा-जेव्हा दिल्लीला जाण्याची वेळ येईल तेव्हा तुम्हाला बरोबर घेऊन जाणार व तुमच्या समोरच कामे मार्गी लावणार असेही ते म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघाची देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, मोठे दादा यांनी पहिली आसल्यामुळे आता माझ्याकडून ही जनतेच्या अपेक्षा भरपूर असल्याने मतदारसंघातील जनतेने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आणि ही जबाबदारी वाटून घेण्यासाठी माझ्या बरोबर तुम्हाला नारायण आबा पाटील यांना आमदार कराव लागणार आहे. मी ही अहोरात्र प्रयत्न करून आबांना आमदार करणार असुन आपणही तेवढ्याच ताकतीने आबांच्या पाठीशी उभा राहावे असे खासदार धर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला सांगितले व पुन्हा करमाळा मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या मताधिक्याचे आभार मानले.
या कृतज्ञता संवाद व आभार मेळाव्यात नारायण पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना करमाळा मतदारसंघाने आपणास भरपूर असे मतदान दिले असल्याने आपणास करमाळा मतदारसंघात निधीचे झुकते मापं द्यावे आशी विनंती केली व तालुक्यातील राहिलेले प्रश्न आपण मार्गी लावालं असा विश्वास नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक आ.स.सा.का.मा.संचालक रवींद्र कोकरे यांनी केले तर बारामती एग्रोचे व्हाईस चेअरमन व जि.प.मा.उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जि.प.सदस्या सावितदेवी राजेभोसले, केत्तूर गावचे मा.सरपंच उदयसिंह मोरे-पाटील, रामभाऊ कोकाटे यांनी या मेळाव्यास संबोधित केले.
त्यावेळी उपस्थितीत शहाजी राजेभोसले, क.कृ.उ.बा.समितीचे संचालक नवनाथ झोळ, मा.उपसभापती अतुलभाऊ पाटील, धुळाभाऊ कोकरे, संतोष पाटील, पंचम राजेभोसले, संग्राम राजेभोसले, जालिंदर पानसरे, नागाशेठ लकडे, पत्रकार विजयाकुमार गायकवाड, पत्रकार शीतलकुमार मोटे, पत्रकार गाडे, अजित रणदिवे, सुग्रीव दोडमिसे, अजिनाथ लालगे, पोपट कर्चे, सचिन घाडगे, मंगेश फडतरे, रमेश घाडगे, नागनाथ काळे, सरपंच पोपटराव माळशिकारे, सरपंच शाम ओंभासे, निलेश वारगड, सरपंच मावली भागडे, आजिनाथ फासे, हरिभाऊ गुळवे, चाकणे, सरपंच ज्ञानेश्वर दोडमिसे, सरपंच संतोष बाबर, मनोहर शेलार, आप्पासाहेब जाधव, विनोद बाबर, सरपंच राजेंद्र भोसले, बंडू माने, महादेव जिरंजे, महारुद्र बाबर, युवराज मेरगळ, प्रथमेश पाटील, देवा नवले, महादेव देशमुख, अंकुश साखरे, बलभीम गावडे, आबासाहेब शेलार, नवनाथ आंबोधरे, सोमनाथ तानवडे, पप्पू गिरंजे, महेंद्र पाटील, अजित रणदिवे, नानासो पवार त्याचबरोबर जिल्हा परिषद कोर्टी गटातील सर्वच मतदार ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार किरण कवडे यांनी मानले.