[करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये केळी पिकाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती आहे व वादळी वारा पाऊस दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत तसेच गेल्या काही दिवसात झालेल्या वादळी वाऱ्याने हजारो एकर केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. केळी पिकाचा समावेश हा पिक विम्या मध्यें आहे परंतु त्याचा प्रीमियम हा फार जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना प्रिमीयम भरण्यास अडचण निर्माण होते आहे. तरी
केळी पिकावरील प्रीमियम जर कमी केला तर शेतकऱ्यांना विमा भरणे शक्य होईल परिणामी शेतकऱ्यांना आसमानी संकटाशी तोंड देण्याला थोडा आधार मिळेल तरी केळी पिकावरील प्रीमियम कमी करून शेतकऱ्यांच्या हितासाठी याविषयी गांभीर्याने निर्णय घेणे आवश्यक आहे. तरी प्रिमीयर कमी करण्यात यावा अशी मागणी भाजपा चे जिल्हा सचिव व प्रधान मंत्री पिक विमा तक्रार निवारण समिती सदस्य लक्ष्मण केकान यांनी केली व निवेदन तहसीलदार कार्यालय करमाळा यांना दिले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, लेबर फेड्रेशन चे संचालक माणसिंग खंडागळे, भाळवणी चे मा. सरपंच वाघमारे, कुभेज चे सातव व शेतकरी उपस्थित होते.