कमलाई नगरी

केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरी राज्यस्तरीय केळी परिषद कंदर ता.करमाळा येथे पार पडली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनादवारे केळी पिकवणार्या शेतकर्यांचा आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते केळी रत्न पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला. तसेच व्यापारी व्यवसायिक व शेतकर्यांनी लावलेल्या सेंद्रीय केळी, औषधे, कृषी साहित्य व तत्सम वस्तुंच्या स्टाॅलची पहाणी आ.मोहिते पाटील यांनी केली.

प्रसंगी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत केळी उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शेलगाव ता.करमाळा येथे केळी संशोधन केंद्र व केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात सोलापुर जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले तसेच किसान रेल्वे शेतकर्यांसाठी उपयुक्त असुन त्या पुन्हा सुरु करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सांगुन कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातुन साठवणुक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगुन पिकविमा नुकसान भरपाई तसेच शालेय पोषण आहारात केळीच्या समावेशाची आंमलबजावणीसाठी  आग्रही राहणार असल्याचे सांगुन शेतकर्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी विधिमंडळाच्या माध्यमातुन आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण,जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील,सविताराजे भोसले,भारतनाना पाटील,संजय पाटील घाटणेकर,अजित तळेकर,कंदरचे सरपंच मौलासाहेब मुलाणी,आदिनाथचे माजी संचालक शिंदे भाऊसाहेब,टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे,अतुलनाना पाटील,कृषी भुषण दादासाहेब पाटील,अदिनाथचे प्रशासकीय संचालक दिपक देशमुख,बंडु माने,राजकुमार सरडे,अमरजित साळुंखे यांचेसह राज्यभरातील केळी उत्पादक संघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *