करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने जन्म मृत्यू नोंद नगरपरिषद, ग्रामपंचायत कार्यालयाच्या दप्तरी न आढळल्यास किंवा जन्म मृत्यू ची नोंद न केल्यास न्यायालयातुन आदेश घ्यावा लागत होता परंतु शासनाने हा अधिकार तहसीलदार यांना दिला असून याच धरतीवर करमाळा शहरातील अनेक नागरिकांनी आपले जन्म दाखल्याचा आदेश मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयात गेली तीन ते चार महिने पुर्वी अर्ज दाखल केले होते परंतु सदरचे प्रकरण हे पुढे मंडलाधिकारी कडे चौकशी ला न जाता तहसील कार्यालयामध्ये धुळ खात पडल्याचे समजते.

       याबाबत आज तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आझाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुस्तकीन पठाण, साजिद बेग, आलीम खान, इम्तियाज पठाण, आदी जणांनी जन्म मृत्यू नोंद बाबत तहसीलदार यांचा आदेश व्हावा यासाठी निवेदन दिले आहे.

            सदर निवेदनात म्हटले आहे की, जन्म मृत्यू नोंद नगरपरिषद दप्तरी दाखल करण्यासाठी तीन चार महिने पुर्वी नागरीकांनी तहसील कार्यालयामध्ये अर्ज दिले होते परंतु अद्याप पर्यंत कोणतेही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी यामध्ये योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर जन्म नोंद साठी तहसीलदार यांचा आदेश व्हावा असे या निवेदनात म्हटले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *