करमाळा प्रतिनिधी

ब्राह्मण महासंघ श्रीदेवीचामाळ यांच्यावतीने सोमवार दि. 29/04/2024 रोजी सामुदायिक व्रतबंध संस्कार सोहळा पार पाडण्यात आला.

हा कार्यक्रम महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांच्या आनंदी लाॅन्स & मंगल कार्यालय पोथरे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमातून 21 ब्राह्मण मुलांचे उपनयन संस्कार करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बटु मुलांचे कुटुंब तसेच त्यांचे पाहुणे व करमाळा तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. तब्बल 1500 पाहुण्यांची भोजन व्यवस्था करण्यात आलेली होती. आलेल्या बटूंना तांब्याचे पळी पंचपात्र, ताम्हण तसेच सोवळे देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतले. हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्याने आलेल्या बटु पालक, पाहुणे मंडळी यांनी भरपुर कौतुक केले.

अशाच सामाजिक बांधिलकीतून पुढील काळात अनेक कार्यक्रमात करण्यात येणार आहेत असे ब्राह्मण महासंघ अध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *