राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर उर्फ सनीदादा सुग्रीव टकले यांची नियुक्ती
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( ग्रामीण ) च्या उपाध्यक्षपदी भास्कर उर्फ सनीदादा सुग्रीव टकले यांची नियुक्ती झाली. यावेळी मा.आ.दिपक आबा पाटील – साळुंखे, कुर्डुवाडी चे नगराध्यक्ष विजुभाऊ श्रीरमे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान केले,महाराष्ट्र राज्याचे
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांचा आशिर्वाद,आ. दिपक आबा पाटील – साळुंखे, यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही निवडीनंतर भास्कर उर्फ सनीदादा सुग्रीव टकले यांनी दिली.यापूर्वी ते सोलापूर अखिल भारतीय सेना पक्षाचे जिल्हाअध्यक्ष म्हूणन काम पाहत होते त्यांनी
जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रा मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.निवडीला उत्तर देताना श्री. टकले म्हणाले की महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे. तो येत्या लोकसभेमध्ये दाखवून देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सर्वाना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्यामधील संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.