करमाळा प्रतिनिधी
भीषण पाणीटंचाई पाण्याची समस्या मिटावी म्हणून शासनाकडून आलेला लाखो रुपयाचा गैरवापर करून पाण्याची अपुरी योजना तसेच जल जीवन चे काम सुद्धा अपुरे ग्रामपंचायत ने लवकरात लवकर ठेकेदार बदलण्यासाठी ठराव घेऊन दुसऱ्या ठेकेदाराची मागणी करून जल जीवन हर घर नल योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून गावाची पाण्याची समस्या मिटवली पाहिजे पण तसे केले जात नाही.
तसेच स्वच्छता सार्वजनिक आरोग्य गावातून येणारा मेन रस्ता आधी कुठल्याही नागरी सुविधा न पुरवणाऱ्या झरे ग्रामपंचायत कडून आकारले जाणारे कुठल्याही स्वरूपाचे कर गावातील नागरिकांनी भरू नयेत असे आव्हान प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष जाधव यांनी गावातील करदात्यां नागरिकांना केले आहे.
याविषयी बोलताना जाधव हे म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून झरेगाव हे दिवसेंदिवस बकाल व घाणेरडे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य याबाबतीत तर कहरच झालेला आहे. जागोजागी साठलेले कचरा-कचऱ्याचे ढीग गावात सर्व दूर कायमचे पसरलेले धूळ व घाणीचे साम्राज्य. डासांचा त्रास यामुळे शोषणाचे व सातीच्या रोगाचे वाढते
प्रमाण यामुळे गावात राहणाऱ्या नागरिकांना जगणेच मुश्किल व्हायला लागलेले आहे. रस्त्याने चालण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. संवेदनहीन अधिकारी व मिल-बाटके खाणारे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्यामुळे गेल्या काही वर्षात गावाची अक्षरश: वाट लागलेली आहे. विविध योजनेसाठी येणाऱ्या करोडो रुपयांच्या निधी पैकी जवळपास 40% रकमेचा
अपहार होत असेल विकास कामाचा दर्जा कसा असणार व आहे हे झरे वासीय गेले अनेक वर्षापासून उघड्या डोळ्यांनी पण निमूट पणे सहन करत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे आत्ता थांबवणे गरजेचे आहे. त्यामुळं निष्क्रिय, भ्रष्ट अधिकारी यांना वटणीवर आणण्यासाठी कर न भरण्याचे असहकार आंदोलन नागरिकांनी सुरू करावे. आगामी ग्रामपंचायत
निवडणुकीत घराणेशाही सत्तेची मक्तेदारी मोडून काढून समविचारी मंडळींनी एकत्र येऊन स्वच्छ प्रतिमेच्या, गाव विकासाची तळमळ असलेल्या नव्या चेहऱ्यांना निवडून आणणे गरजेचे असल्याचे जाधव म्हणाले.