करमाळा प्रतिनिधी 

पोथरे येथील माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे ऋण व्यक्त करण्यासाठी  स्नेहमेळाव्याचे तसेच कृतज्ञता कार्यक्रमाचे जल्लोषात आयोजन केले होते. 

तब्बल 18 वर्षांनंतर प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोथरे येथे इयत्ता सातवी मधील सन (2005-2006) च्या  विद्यार्थ्यांनी  हा मेळावा आयोजित केला होता. 

 वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांचा यामध्ये  कृतज्ञता सत्कार व स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश  करे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुसुमबाई हरिश्चंद्र पेठकर या उपस्थित होत्या.

सन 2005-2006 साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोथरे येथील इयत्ता सातवीत असणारे  विद्यार्थी, विद्यार्थिनी आता पुणे, मुंबई, श्रीरामपूर, संभाजीनगर अशा विविध  ठिकाणी वास्तव्यास आहेत. 

यावेळी सर्वांनी एकत्र येऊन गुरूंचे चरण स्पर्श केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी  रूपाली गोसावी हिने ईशस्तवन केले. यावेळी वर्षा पाटील हिने बहारदार, ओघवत्या, चारोळ्यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी झालेल्या भाषणात  गणेश करे पाटील यांनी आपल्या काव्य पूर्ण शैलीत मनोगत व्यक्त केले. 

यावेळी वर्गशिक्षिका मनीषा हरिश्चंद्र पेठकर-बाभळे, माजी मुख्याध्यापक सुधीर काशिनाथ बाभळे, वर्गशिक्षक  रवींद्र उबाळे सर, आदिंनी आदर्श विद्यार्थी घडवण्याबरोबरच आदर्श नागरिक घडवले आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान केला. 

 वर्ग शिक्षिका मनीषा पेटकर यांनी शिक्षणाबरोबरच समाजात वावरताना कसे वागावे, एकाच वेळी अनेक गोष्टी उत्कृष्टपणे कशा कराव्यात तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, कोणत्याही संकटात न डगमगता (तरी बरं) या वाक्याचे संस्कार केल्यामुळे शिक्षणाबरोबरच संसारात येणाऱ्या अडचणीवर आम्ही सहज मात करू शकलो असे विद्यार्थ्यांनी मनोगतातुन भावना व्यक्त केल्या.  विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्य घडले असेही मत विद्यार्थ्यांनी यावेळी माडंले. 

उबाळे सर यांनी वक्तशीरपणा, टापटीप पणा, शिष्यवृत्ती आदि बाबत चागंले मार्गदर्शन करून चागंले संस्कार केल्याने त्याचा  भविष्यातही उपयोग झाल्याचे विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. यावेळी माजी मुख्याध्यापक सुधीर बाभळे सर, रविंद्र उबाळे सर, हरीश कडू सर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी तत्कालिन गुरुजनांचा जल्लोषात सन्मान केला.  या सर्व विद्यार्थ्यांना बाभळे यांनी सुंदर व आकर्षक  कुंडी सहित गुलाबाची रोपे भेट दिली. यावेळी मनिषा पेटकर यांनी “तुझ्या गळा माझ्या गळा” असे नाविन्यपूर्ण खेळ घेतले. लिंबू चमचा स्पर्धा व संगीत खुर्ची अशा विविध खेळात सर्वांनी सहभाग घेतला. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. अक्षय शिंदे याने राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मनिषा पेटकर यांना बोरे भेट दिली. यावेळी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अस्लम शेख, रूपाली गोसावी यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय शिंदे, शरद शिरगिरे, निलेश रंदवे, चंद्रकांत आमटे, हर्षद वाळूजकर, दयानंद झिंजाडे, पानाचंद झिंजाडे, राम अधोरे, अशोक मोरे, चक्रधर नंदरगे, रेश्मा लोकरे, दीपाली ठोंबरे, पूजा शिंदे, आदि माजी विद्यार्थी तर काही विद्यार्थीनी पतीसह या कार्यक्रमात उपस्थित झाले होते. यावेळी कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. यासाठी रेणुका चिटणीस, सोनाली झिंजाडे, सुवर्णा झिंजाडे, लंका रणवरे, उर्मिला पाडुळे, छकुली झिंजाडे आदिनी परिश्रम घेतले.

यावेळी सर्वांचे स्वागत अस्लम शेख, रेणुका चिटणीस, सोनाली झिंजाडे यांनी केले. वर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सर्वांचे आभार रूपाली गोसावी यांनी मानले. 

चौकट 

 मला मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारापेक्षा माजी विद्यार्थ्यांनी केलेला सन्मान हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सध्याच्या काळात गुरुजनांचे ऋण व्यक्त करण्याचे प्रमाण दुर्मिळ होत आहे. सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेला हा भावनिक सन्मान अतुलनीय होता. अशा कार्यक्रमांचे अनुकरण होणे गरजेचे आहे. 

मनिषा पेटकर-बाभळे, आदर्श शिक्षिका, करमाळा 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *