करमाळा प्रतिनिधी

मौजे उमरड ता. करमाळा, जि. सोलापूर येथील ज्येष्ठ नेते वामनदादा बदे यांच्या सुचनेनुसार सरपंच व उपसरपंच यांच्यामध्ये विविध समाज घटक व ग्रामपंचायत सदस्य यांचे मागणीनुसार सकल मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे हि प्रमुख मागणी केली असून, सदर विषयानुसार गावात आक्रमक वातावरण तयार झाले असून जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधी व लोकप्रतिनिधी विरोधात भूमिका वाढली असून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास आरक्षण मिळावे हि प्रखर मागणी होत आहे.

तरी आज दिनांक ३१/१०/२०२३ रोजी मराठा आरक्षण मोर्चाला पाठींबा म्हणून गाव बंद ठेवले आहे. जर कोणीही सदरील नियम मोडल्यास समाज कोणत्याही पातळीवर जाऊन आक्रमक अंदोलन करेल व त्याच्या होणाऱ्या परिणामास सामोरे जावे लागेल.

सदर ठराव सर्वानुमते घेऊन मंजूर करण्यात आला आहे.

सदर ठराव लाला नामदेव पडवळे सरपंच, रतन मुकेश बदे उपसरपंच तसेच उमरड गावातील ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक करमाळा यांना निवेदन देण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *