मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे एकोणीस हजार कोटी कर्ज माफ केले
करमाळा प्रतिनिधी
करमाळा भारत राष्ट्र समितीच्या वतीने भारत देशाचे नेते तेलंगानाचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे एकोणीस हजार कोटी कर्ज माफ केले आहे. करमाळा शहरामध्ये सुभाष चौक येथे विजय उत्सव, आनंद उत्सव साजरा केला. करमाळा तालुका भारत राष्ट्र समितीचे समन्वयक अण्णासाहेब सुपनवर ,भारत राष्ट्र समिती ओबीसी

समन्वयक शिवाजीराव बनकर, भारत राष्ट्र समिती किसान तालुका समन्वयक दादासाहेब महानोर, भारत राष्ट्र समिती एस सी समन्वयक विकास भोसले, भारत राष्ट्र समिती अल्पसंख्यांक समन्वयक बाबा शेख, वस्ताद मौला, अतुल सनगर, धनंजय लोखंडे, कारभारी सलगर, हरिदास भांड, दसरथ वाडेकर, तेलंगणाचे मुख्यमंत्री के शंकरराव यांनी तेलंगणा राज्यांमध्ये

शेतकऱ्यांना 24 तास मोफत लाईट, पाणीपट्टी नाही, पेरणीसाठी दहा हजार रुपये एकरी, दलित बंधू योजनेतून दहा लाख रुपये अनुदान, धनगर समाज व ओबीसी समाज यांना प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान अशा 444 योजना तेलंगणा राज्यांमध्ये

यशस्वीपणे राबवल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या त्या थांबवल्या. तेलंगाना राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे एकोणीस हजार कोटी माफ केले. महाराष्ट्र शासनाने तेलंगणाच्या सरकारचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी भारत राष्ट्र समिती करमाळा यांच्यावतीने करण्यात आली. करमाळा शहरांमध्ये फटाक्यांचे आतिश बाजी करून पेढे वाटण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *