करमाळा प्रतिनिधी

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑनलाइन व ऑफलाईन अबॅकस व वैदिक मॅथ आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये यशाची उज्वल परंपरा असलेले मुथा नॉलेज फाउंडेशन चे 65 विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन आंतरराष्ट्रीय स्तरासाठी सहभागी झाले होते. ओरिस्टो किड्स आयोजित पुणे येथे ऑफलाइन परीक्षा चे आयोजन करण्यात आले होते. एकूण साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा जिल्ह्यातून राज्यातून सहभाग होता. करमाळ्यामधून एकूण 52 विद्यार्थी परीक्षेसाठी सहभागी झाले होते. तेथे विद्यार्थ्यांना सात मिनिटांमध्ये शंभर गणिते सोडवणे बंधनकारक होते.

पहिला दुसरा तिसरा रँक मध्ये अकॅडमीचे आठ विद्यार्थी व चौथा पाचवा सहावा रँक मध्ये 25 विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क्स घेऊन विजयी झाले ट्रॉफी व सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण 4 एप्रिल रोजी यश कल्याणी सेवाभावी सदन येथे पालकांच्या प्रचंड उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष गणेश करे पाटील होते व मार्गदर्शक सुनीता देवी, डॉक्टर स्वाती बिले, डॉक्टर स्वाती घाडगे, मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर, डॉक्टर सारिका विटूकडे मॅडम, डहाळे मॅडम, कोकण मॅडम, प्रा.उत्तम विटूकडे सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. गणेश करे पाटील सर यांनी सांगितले की, गणित हा विषय ज्याला जमतो त्याला जीवनाचं गणित जमतं त्यासाठी अभ्यास हे स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे व ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे या माध्यमाने विद्यार्थ्यांचा राईट व लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह होतो. विद्यार्थ्यांचे डेमोही तेथे सादर करण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांनी केलेले गणिते कॅल्क्युलेटर वर चेक केली सर्वांनी अचूक गणिते सोडवल्याबद्दल त्यांचे कौतुकही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मोनिका चौधरी मॅडम व पिसे मॅडम यांनी अबॅकस रिलेटेड रांगोळी काढून सर्व पालकांची मने जिंकली.

अकॅडमी ची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली अकॅडमी या स्पर्धेसाठी 65 विद्यार्थी सहभागी झाले होते. अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे या शाळेतूनही विद्यार्थी सहभागी होते. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर विविध लेव्हल्स मधून विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले.

बक्षिसाचे मानकरी खालील प्रमाणे

सार्थक मकरंद वनारसे इंटरनॅशनल रँक तिसरा, सार्थक संजय करंडे आंतरराष्ट्रीय रँक फोर्थ, आदित्य अभिजीत दुधे आंतरराष्ट्रीय रँक 1st, विवान दिनेश मेहेर फर्स्ट रँक, स्वरा प्रीतम बलदोटा आंतरराष्ट्रीय सिक्स रँक घेऊन ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परीक्षेत वैदिक मॅथ मध्ये फर्स्ट रँक आदित्य सुहास कापसे, शरवरी रोहित शिंदे (आंतरराष्ट्रीय सातवा रँक), प्रणील अनिल वैद्य आंतरराष्ट्रीय रँक 49, सुयश दयानंद चौधरी आंतरराष्ट्रीय रँक 19, श्रावणी रामेश्वर खराडे आंतरराष्ट्रीय रँक 7, आर्यन तात्यासाहेब जाधव आंतरराष्ट्रीय रंक 18, अथर्व गहिनीनाथ बनसोडे आंतरराष्ट्रीय रँक 32, साद बागवान आंतरराष्ट्रीय 50, रिद्धी प्रशांत शिंदे आंतरराष्ट्रीय 54, प्रतीक जालिंदर सावंत 55, राजवी चिन्मय मोरे 58, आरुष बलभीम बनसोडे 18, आदिश आशिष मेहता 125, शंभुराजे प्रफुल्ल शिंदे 93, शिवतेज वर्धमान जाधव 77, ऋषिराज वीरेंद्र लष्कर 52, रिदम भूपेंद्र बोराडे 9, शरयू रघुनाथ फरतडे 11, अन्वी अमोल हिरण 50, रियांशी प्रणित कुमार जैस्वाल 45, ईश्वरी भारत मुकणे 30, साई सागर काळे 59, यश नरेश शहा 21, स्पंदन बापू घरबुडे 16, आर्यन सामराज कापसे 102, सहभागी अनुजा भोसले, सानवी राठोड

या कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त केलेले विद्यार्थी

ऋचा नितीन काळे, सानवी सुशील राठोड, श्रावणी महेश गवळी, राजवी चिन्मय मोरे व पालकांमध्ये प्राध्यापक नितीन काळे सर, प्राध्यापक लक्ष्मण भोसले सर, सौ भारती लष्कर मॅडम, प्रियंका जयस्वाल मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

वरील सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर करमाळ्याचे नाव लौकिक केले आहे व मुथा अबॅकस अकॅडमी ला विक्रमांचा उच्चांक मिळून दिलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांचे मार्गदर्शन लाभले तसेच स्मिता वनारसे व पूजा शिंदे, राणी सावंत यांचेही अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडम व आभार प्रदर्शन प्राध्यापक उत्तम विटूकडे सरांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *