करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील, झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलचे अतिशय आनंदमय व उत्साही वातावरणात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य अविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) सुरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

जेऊर गावचे कार्यक्षम सरपंच पृथ्वीराज पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी भूषवले. जयप्रकाश बिले यांनी अध्यक्षीय भाषणात सुरज भैय्या देशमुख यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरव उद्गार काढले. तसेच पृथ्वीराज पाटील यांच्या जेऊर गावच्या उल्लेखनीय विकासासाठी कौतुक केले. यावेळी बेली

उद्योग समूहाचे हरिदास डांगे,  निवृत्त पोलीस अधिकारी गोडगे, झरेचे उद्योजक नारायण शेठ अमृळे, सरपंच बंडू घाडगे, माजी सरपंच प्रशांत पाटील, प्रा.राजेश शिंदे, भीमराव घाडगे, रूपाली माने, दाक्षायणी पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव युवराज बिले,  आशाताई बिले, बीसीए कॉलेजचे हेड किरण परदेशी सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, कांतारा, राधाकृष्ण, शंकर तांडव नृत्य, विठ्ठल गोरा कुंभार राम हनुमान, शिवकन्या, छावा, फनी डान्स, रीमिक्स डान्स, लावणी अशा अनेक प्रकारच्या गीतांवर अतिशय सुंदर असे नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह अतुलनीय होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती बिले मुख्याध्यापिका अमृता परदेशी सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार वलटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.सतीश कोंडलकर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *