करमाळा प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या वतीने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पहिल्याच फेरीमध्ये वेदांत सचिन व्हटकर या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पोखरापुर ता. मोहोळ या
ठिकाणी निवड झाली आहे. तो कोंढेज ता.करमाळा, जिल्हा सोलापूर या गावचा रहिवाशी असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकटणे तालुका करमाळा येथे शिक्षण घेत आहे. अगदी पहिलीपासून वेदांतला एटीएस, मंथन यासारख्या स्पर्धा परीक्षांचे खूप
आवड होती. अगदी पहिलीपासूनच त्याने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करून सतत पहिली ते पाचवी मध्ये झालेल्या एटीएस, मंथन या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या पाच मध्ये क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल
केले आहे. यासाठी त्याला पहिलीपासून वर्गशिक्षक सचिन व्हटकर यांचे मार्गदर्शन लाभले पुढे त्याला नवोदय विद्यालया बद्दल आकर्षण वाटू लागल्याने त्याने प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने चौथीपासूनच नवोदय परीक्षेची तयारी केली. ज्ञानदा अकॅडमी
फलटण येथील अविनाश सुतार सर व सुतार मॅडम यांचे त्याला या परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले यासाठी त्याला त्याच्या आई-वडिलांकडून आजी कडून काका काकींकडून नेहमीच प्रोत्साह मिळाले त्यामुळे नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम
त्याने बौद्धिक गुणवत्तेच्या जोरावर सहजरीत्या पूर्ण केला. या यशाबद्दल वरकटणे शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांनी वेदांतचे व शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.