करमाळा प्रतिनिधी
शिवानी दैन हिची राज्यसेवेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून गटविकास अधिकारी वर्ग एक या पदावरती निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवानी दैन यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
यामध्ये गटविकास अधिकारी वर्ग एक या पदावरती निवड झालेली आहे. त्यांचे मूळ गाव वांगी असून, शिवानी यांच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. आई शेतमजूर म्हणून काम करत होती. अशा परिस्थितीमध्ये पुणे येथे जाऊन स्पर्धा
परीक्षेची तयारी केली. २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेत तिला घवघवीत असे यश प्राप्त झालेले आहे. शिवानीला स्पर्धा परीक्षेसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करणारे दिगंबर राखुंडे यानी सत्कार तिचा सत्कार केला.