
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी विनोद घुगे,,सहाय्यक अश्विनी जगताप, अक्षय पोमण, पत्रकार जयंत दळवी आदीजण उपस्थित होते
नागरिकांना संबोधित करताना घुगे यांनी लोकांनी वाहन चालवत असताना घ्यावयाची काळजी व लोकांकडून होणाऱ्या चुका याबद्दल मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गावडे यांनी वाहन चालवत असताना दुचाकी,चार चाकी, त्याचबरोबर मोठ्या वाहनधारकांनी कोणत्या नियमाची अंमलबजावणी करावी ते उदाहरणासहित सांगितले. त्याचबरोबर अपघातामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली. त्याचबरोर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहरातून बाईक रॅली काढली. रॅली मध्ये

आरटीओ यांची गाडी पुढे त्यापाठीमागे मोटारसायकली आणि त्यांच्या पाठीमागे ड्रायविंग स्कुल च्या गाड्या होत्या. गाडयांना समाज जागृतीसाठी बॅनर लावलेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन ड्राईव्ह स्कूल असोसिएशन करमाळा यांनी केले. या मध्ये

प्रामुख्याने साई ड्रायविंग स्कूल जेऊर, शौर्य ड्रायव्हिंग स्कूल व कृष्णा ड्रायव्हिंग स्कूल करमाळा त्याचबरोबर शिवरत्न बजाज जेऊर व कमलाई मोटर्स करमाळा यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला सूत्रसंचालन कमलाई मोटर्स चे सतीश रुपनर यांनी केले व आभार प्रदर्शन अक्षय पोमण यांनी केले.

