छोटू महाराज या सिनेमागृहाचे उद्घाटन सोहळा संपन्न

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील चित्रपट गृह बऱ्याच दिवसापासून बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात नवीन चित्रपट पाहणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आसपासच्या गावी जाऊन सिनेमा पहावे लागत होते. पण आता करमाळा येथे नव्याने सुरू झालेल्या छोटू महाराज या सिनेमागृहामुळे लोकांची ती अडचण दूर होणार आहे. याचे उद्घाटन करमाळा येथिल नागरिक चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे व मंगेश बदर यांच्या हस्ते झाले आहे.

अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर करमाळा शहरालगत राजयोग हॉटेलच्या जवळ सदरचे थिएटर झाल्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी जास्त लांब जावे लागणार नाही. सुसज्ज असे थिएटर असून या ठिकाणी एकावेळी १०० जणांची बसण्याची व्यवस्था आहे. एक वेगळ्या शैलीचे हे थिएटर करमाळा सिनेमा पाहण्याची हाऊस पूर्ण होत आहे.

करमाळ्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रमोद चांदगुडे, मुलगा निखिल चांदगुडे, तेजस चांदगुडे यांनी हे नियोजन केले आहे. तालुक्यातील सर्वप्रमुख पाहुणे मंडळी उद्घाटन वेळी या ठिकाणी उपस्थित झाले होते. यावेळी माजी आमदार नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेनेचे प्रवीण कटारीया, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे ओएचडी मंगेश चिवटे, महेश चिवटे, कन्हैयालाल देवी, महादेव फंड, टायगर ग्रुप चे तानाजी जाधव, राजेंद्र चिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले.

…..

छोटू महाराज या सिनेमागृहांमध्ये उत्तम सोय झाली आहे. अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच थिएटर करमाळा येथे सुरू झाले आहे. याचा लाभ रसिकांनी घ्यावा. – निखिल चांदगुडे उद्योजक, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *