करमाळा प्रतिनिधी

अहिल्यानगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात “द युवा ग्रामीण पत्रकार संघ” महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या गुणगौरव सोहळ्यात हिसरे तालुका करमाळा येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केल्याबद्दल राजेश रघुनाथ पवार यांना राज्यस्तरीय “समाजभूषण पुरस्कार” 2025  दिला. या कार्यक्रमात त्यांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुरस्कार सन्मानपत्र सह मेडल देऊन सन्मानित केले. राजेश पवार हे पत्रकार असून गेली अनेक वर्ष फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे बहुजन समाजासाठी काम करतात. बामसेफ संयोजक बहुजन समाज पार्टी सातारा या पदावर काम करतात. यापूर्वी यांना ‘द बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र’ राज्य यांच्या वतीने “समाजरत्न पुरस्कार” 2019 आणि दैनिक तुफान क्रांती यांच्या वतीने “आदर्श सन्मान पुरस्कार 2022”  देऊन सन्मानित करण्यात आले होते. यांना या पुरस्कारामुळे हिसरे गावात पंचक्रोशीत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची पावती आहे.

हा पुरस्कार सोहळा मुख्य अग्निशामक अधिकारी शंकर पिसाळ व पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख सर,  राज्य उपाध्यक्ष प्रा. जीवन मोहिते सर, प्रांत अधिकारी सुधीर पाटील, बहुजन समाज पार्टीचे प्रेम मोरे,  द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा आणि तालुका प्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश काळे यांनी मांडले तर आभार प्रदर्शन प्रा. जीवन मोहिते सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *